"घरी कोणी आलं तर, चहाबरोबर खायला द्यायला काही आहे का?" किशोर ऑफिसमधून आल्या आल्या विचारू लागला.
"खायला म्हणजे, चहा बिस्किटं, चहा पोहे की अजून काही? कोणी येणार आहे का?"
"हो. येणार आहेत तीन विद्यार्थिनी, असिस्टंट इंजिनियर, पण त्या आल्यावर तू काही करत बसण्यात वेळ घालवू नकोस. काहीतरी आधीच करून तयार ठेव."
दुपारी तीन वाजता हा सांगतो, पाच वाजता येणार आहेत.
मटकीची उसळ तयारच होती. त्याला जरा सजवलं की महाराष्ट्रीयन मिसळ लवकर होईल, असा विचार करून कांदा टोमॅटो कापायला घेतले.
"ते सगळं मी करतो, तू तयार हो, कारण त्या तुला भेटायला येणार आहेत."
"अरे वा! मला भेटायला? का बरं?"
मनातल्या मनात मला आनंद, आश्चर्य वाटत होतं, माझ्याकडे काय काम असेल यांचं? प्रमोशन होणारे, नवीन रुजू होणारे कित्येकजण इथे प्रशिक्षणासाठी येत असतात. कधी बाहेर

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा