सोमवार, २७ ऑक्टोबर, २०२५

पारतंत्र्य - कविता

 पारतंत्र्यात माझं स्वातंत्र्य

सतत उमलणाऱ्या विचारफुलांच्या गुच्छानं मला बांधलंय,
ते न वाचण्याचं स्वातंत्र्य मी गमावलंय.
कधीमधी होणार्या हास्यगोष्टींच्या गाठीभेटी,
त्या चुकवण्याचं स्वातंत्र्य मी हरवलंय.
वार्षिक सहलींचा अलभ्य, लाघवी लाभ,
तो नाकारण्याचं स्वातंत्र्य मी सोडलंय.
वेगवेगळ्या विषयांच्या शब्दसागरात डुंबणारे लेख,
न वाचता पुढे जाण्याचं स्वातंत्र्य मी विसरलेय.
भावनांच्या सुंदर कविताबागेत फिरताना,
त्यातून बाहेर पडण्याचं स्वातंत्र्य मी नाकारलंय.

ज्यांच्या प्रेरणेने माझी लेखणी फुलवली,
त्या समूहाला सोडून जाण्याचं स्वातंत्र्य मी अव्हेरलंय.
पण,
ज्यांनी मला स्वतःला शोधायला शिकवलं,
या मामबो शब्दबंधांच्या, प्रेरणासमुहाच्या पारतंत्र्यात
राहण्याचं स्वातंत्र्य मात्र मला मनापासून उपभोगायचंय...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

अनुभव_एका_पावसाचा

  अनुभव_एका_पावसाचा नुकतीच मी श्रीकांत सुनीताच्या घरी काही कारणाने जाऊन आले. गेट उघडलं तर समोर सुनीताला बघून मी म्हटलं, "अगं, किती छान ...