स्वप्नातल्या कळ्यांनो… डिजिटल आवृत्ती
स्वप्नातल्या कळ्यांनो, नेटवर रात्र जागवू नका
गोडी रील्स-शॉर्ट्सची लाविल वेड जीवा॥धृ.॥
रेखाकृती सुखाच्या, डिपीत ठेवलेल्या
अन स्टेटसच्या कल्पना डोक्यात घोळलेल्या
कधी लाईक्सचा पुर, कधी कमेंटला विसावा ॥१॥
नैराश्य अशावेळी, गेम्स खेळूनी घालवी
स्वीगी झोमॅटो पॅकेट्सनी पोटपूजा पुरवावी
चॅट करता मित्रा, मिळे नवकल्पनांचा मेवा ॥२॥
सिद्धीस कार्य जाता, नेट झालं स्लो जरी
स्वप्नं उरी बाळगा, डाटा संपला तरी
ऑफलाईनही चालतं कार्य, चिकाटी मनी ठेवा॥३॥
 
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा