घरी लक्ष्मीपूजन झालं आणि आम्ही बाल्कनीत जाऊन बसलो. चोहोबाजूंनी फटाक्यांचा गोंगाट सुरू होता. कानठळ्या बसतील असे आवाज, आकाशात सप्तरंगी चमचमणार्या ठिणग्या उडत होत्या, विरत होत्या. विरताना आपलं अस्तित्व धुराच्या रूपात ठेवून जात होत्या. एकदा वाटलं, धोधो पाऊस यावा आणि सगळं धूसर वातावरण धूऊन निघावं.
कशाकशाचा ऱ्हास होतो या दिवशी? पैसा, हवेतील ऑक्सिजन, पायाखालची स्वच्छता आणि काय काय…
दोन दिवसांनी जोरदार पाऊस पडला. जणू दिवाळी संपायचीच वाट बघत होता तो. सगळ्या भौतिक, आत्मिक गजबजाटाला स्वच्छ केलं, असं वाटलं आणि मी शांतपणे झोपले.
बंद डोळ्यांसमोर आकाशातल्या ठिणग्या फेर धरू लागल्या. हळूहळू माझ्या जवळ येऊ लागल्या.
त्या जवळ येताच जाणवलं, त्या ठिणग्या नसून सगळे विविधरंगी, विविधढंगी अमिबा आहेत.
आणि मीही त्यातली एक.
मी अमिबा झाले होते.
एकपेशीय, आकारहीन, न आवाजाचा, न चेहऱ्याचा.
फक्त एक जिवंत ठिपका; एकाकी, स्वच्छंद, कुठेही भरकटणारा.
एकपेशीय, आकारहीन, न आवाजाचा, न चेहऱ्याचा.
फक्त एक जिवंत ठिपका; एकाकी, स्वच्छंद, कुठेही भरकटणारा.
सुरुवातीला फार मजा वाटली.
ना उठल्यावर मोबाईल पाहायचा त्रास,
ना कोणाच्या अपेक्षा, ना कोणती जबाबदारी.
ना कुणी विचारणार, “आज काय बनवलंस?”
ना कुणी म्हणणार, “तू इतकावेळ काय करत होतीस?”
शांततेचं, निर्व्याज जगणं…
जणू आयुष्याचा साइलेंट मोड.
ना उठल्यावर मोबाईल पाहायचा त्रास,
ना कोणाच्या अपेक्षा, ना कोणती जबाबदारी.
ना कुणी विचारणार, “आज काय बनवलंस?”
ना कुणी म्हणणार, “तू इतकावेळ काय करत होतीस?”
शांततेचं, निर्व्याज जगणं…
जणू आयुष्याचा साइलेंट मोड.
पण थोड्याच वेळात ती शांतता बोचू लागली.
मी सरकत होते, खात होते, पुन्हा सरकत होते.
काहीतरी हरवल्यासारखं वाटत होतं.
‘बोलावं’ असं मनात आलं, पण आवाजच नव्हता.
‘पाहावं’ असं वाटलं, पण डोळेच नव्हते.
आणि तेव्हाच जाणवलं-
अमिबा जगतो, पण जगणं अनुभवत नाही.
मी सरकत होते, खात होते, पुन्हा सरकत होते.
काहीतरी हरवल्यासारखं वाटत होतं.
‘बोलावं’ असं मनात आलं, पण आवाजच नव्हता.
‘पाहावं’ असं वाटलं, पण डोळेच नव्हते.
आणि तेव्हाच जाणवलं-
अमिबा जगतो, पण जगणं अनुभवत नाही.
त्या स्थिरतेत कुठेतरी आईचा चेहरा डोळ्यासमोर आला.
ती म्हणायची, “तू आलीस की घर उजळतं.”
त्या वाक्याची उब आठवली, आणि छातीत एक हुरहूर उठली.
ती म्हणायची, “तू आलीस की घर उजळतं.”
त्या वाक्याची उब आठवली, आणि छातीत एक हुरहूर उठली.
अमिबाला घरच नसतं
ना भिंती, ना दारं, ना ‘आपुलकी’ नावाचं ठिकाण.
मी दुसऱ्या अमिबाकडे सरकले
कदाचित कुणाशी थोडं मन मोकळं करावं म्हणून.
पण त्याचं जगणं माझ्यासारखंच
शांत, निर्विकार, नि:शब्द.
ना ओळख, ना नातं.
मला अचानक कळलं,
एकटेपणाचं शास्त्रीय नाव ‘अमिबा’ असावं.
कदाचित कुणाशी थोडं मन मोकळं करावं म्हणून.
पण त्याचं जगणं माझ्यासारखंच
शांत, निर्विकार, नि:शब्द.
ना ओळख, ना नातं.
मला अचानक कळलं,
एकटेपणाचं शास्त्रीय नाव ‘अमिबा’ असावं.
त्या क्षणी मला जाणवलं,
आपण माणसं किती नशीबवान आहोत.
आपण हसतो, रडतो, रागावतो, माफ करतो.
या सगळ्या भावनांनीच आपलं आयुष्य रंगतं.
कधी गाणं ऐकून मन हलकं होतं,
कधी एखाद्या नजरेत आपलं सगळं आयुष्य गुंफलेलं दिसतं.
कधी नुसतं कुणी ‘कशी आहेस?’ विचारलं,
की सगळा थकवा गळून पडतो.
आपण माणसं किती नशीबवान आहोत.
आपण हसतो, रडतो, रागावतो, माफ करतो.
या सगळ्या भावनांनीच आपलं आयुष्य रंगतं.
कधी गाणं ऐकून मन हलकं होतं,
कधी एखाद्या नजरेत आपलं सगळं आयुष्य गुंफलेलं दिसतं.
कधी नुसतं कुणी ‘कशी आहेस?’ विचारलं,
की सगळा थकवा गळून पडतो.
अमिबा असणं म्हणजे स्थिरतेचं परम रूप,
पण त्या स्थिरतेत ना संगीत आहे, ना माणुसकी.
ती शांतता म्हणजे निर्जीवतेची शांतता.
पण त्या स्थिरतेत ना संगीत आहे, ना माणुसकी.
ती शांतता म्हणजे निर्जीवतेची शांतता.
स्वप्नाच्या शेवटी मी स्वतःच विभाजित होत होते,
दोन भागांत तुटत चालले होते.
तेव्हा एक भितीदायक विचार आला,
‘आता मी कोण? आणि तो दुसरा कोण?’
स्वतःचं अस्तित्व गळून जाण्याची ती भीती फार खरी होती.
दोन भागांत तुटत चालले होते.
तेव्हा एक भितीदायक विचार आला,
‘आता मी कोण? आणि तो दुसरा कोण?’
स्वतःचं अस्तित्व गळून जाण्याची ती भीती फार खरी होती.
आणि इतक्यात,
सूर्यकिरणांनी माझ्या चेहऱ्यावर हलकं उबदारपण पसरवलं.
डोळे उघडले, खिडकीतून सकाळ आत आली होती.
आरोही शेजारी, “खूप झोप झाली,” कानाशी गुणगुणत होती,
स्वयंपाकघरातून किशोरनं केलेल्या कॉफीची दरवळ, घराचं मोहक हास्य,
सगळं पुन्हा जिवंत झालं.
सूर्यकिरणांनी माझ्या चेहऱ्यावर हलकं उबदारपण पसरवलं.
डोळे उघडले, खिडकीतून सकाळ आत आली होती.
आरोही शेजारी, “खूप झोप झाली,” कानाशी गुणगुणत होती,
स्वयंपाकघरातून किशोरनं केलेल्या कॉफीची दरवळ, घराचं मोहक हास्य,
सगळं पुन्हा जिवंत झालं.
माझ्या मनात हलकंसं स्मित उमटलं.
मन हळूच उद्गारलं,
जर असं आयुष्य वाट्याला आलं,
तर ‘अमिबा असणं सोपं असेल, पण माणूस असणं सुंदर आहे.’
राजेश्वरी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा