सोमवार, २७ ऑक्टोबर, २०२५

प्रतिमा_आणि_प्रतिभा - कविता


 प्रतिमा_आणि_प्रतिभा

काळ आठवतो एक असा
वृक्ष मी डेरेदार जसा
पांथस्थ विसावत माझ्या छायेत
पक्षी शोधत आसरा मायेत
छाया दिसता तो विसावला
दृष्टान्त त्याला मनी जाहला
दर्शन भगवंतांचे स्वप्नी घडले
वास माझा इथे बोलले
पांथस्थ खडबडून जागा झाला
नजरेसमीप ज्योत आली
बघता बघता अंतर्धान पावली
भगवंत प्रसन्न झाले वदला
त्याच जागी शिला स्थापिली
म्हसोबा नामकरण झाले
संकटनाशन कराया अवतरला
जागृत देवस्थान कीर्ती दुमदुमली
समज चहू दिशा पसरला
लोकांच्या झुंडी येऊ लागल्या
आपली पथारी मांडू लागले
नैवेद्य पंक्ती घडू लागल्या
ऋतु बदलता पानगळ झाली
भक्तांना सावलीची आस लागली
चिर्यांच्या भिंती तयार झाल्या
घावांनी अस्तित्व वृक्षाचे विरले
घालू साकडे भक्तगण जमले
पाव नवसाला म्हणू लागले
चिर्याचिर्यात वृक्षाचा आक्रोश सामावला
दिवसामाजी कीर्ती सरली
भक्तांचा ओढा थमला
मंदिर शांत निर्जन दुर्मुखले
मम वृक्षाचे बीज रुजले
कोवळी पालवी चिरांमधून हसली
किरणांकडे झेपावू लागली
मुळं आधार होऊ लागली
रोष मनातला चिर्याचिर्यात कवटाळला
जीवनचक्र पूरते फिरले
माझे अस्तित्व मला गवसले...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

अनुभव_एका_पावसाचा

  अनुभव_एका_पावसाचा नुकतीच मी श्रीकांत सुनीताच्या घरी काही कारणाने जाऊन आले. गेट उघडलं तर समोर सुनीताला बघून मी म्हटलं, "अगं, किती छान ...