जून १९७५ मध्ये आणीबाणी जाहीर झाली. त्याचवर्षी साहित्य संमेलनाचं ५१वं वर्ष होतं. डिसेंबर १९७५ ला कराडला साहित्य संमेलन होणार असं ठरलं. मावळते अध्यक्ष होते पु. ल. देशपांडे आणि नवीन अध्यक्षा होत्या दुर्गा भागवत. कराडला कोणताही साहित्यिक, सांस्कृतिक कार्यक्रम असला की मा. यशवंतराव चव्हाण बहुतेकवेळा हजेरी लावायचेच. आम्हा भावंडांना बाकी काही कळत नसलं तरी त्यांचं भाषण ऐकायला बाबा आम्हाला घेऊन जायचे. मी त्यावेळी चौथीत होते.
मला आठवतं ते, संमेलनाच्या ठिकाणी बाबा आम्हाला घेऊन गेले होते. भला मोठा मांडव, दोन्ही बाजूला पुस्तकांचे स्टॉल, पायाखाली रेड कारपेट, समोर स्टेजवर बरेच साहित्यिक बसले होते. कोण बोलत होते त्याकडे आमचं लक्ष नव्हतंच; लक्ष होतं ते पांढरी शुभ्र टोपी, धोतर, जाकीट घातलेल्या यशवंतरावांकडे. साहित्य संमेलन म्हणजे काय हे देखील त्यावेळी कळत नव्हतं. भरपूर पुस्तकं बघायला मिळतात ते संमेलन असं पक्क मनात बसलं होतं.
थोडं वय वाढत गेलं आणि कराडच्या संमेलनात झालेल्या घटना कळू लागल्या. पु. ल. देशपांडे यांचे खुसखुशीत खुमासदार भाषण, दुर्गा भागवतांनी आणीबाणीबद्दलचे पत्रक संमेलनात यशवंतरावांना न देण्याचा केलेला ठाम निर्धार... असे काही किस्से ऐकले होते.
त्या दिवसात घरात सारखी तीच चर्चा असायची.
त्यावेळी घडलेला एक किस्सा एकदा वाचनात आला...
(यापुढचे शब्द कॉपी पेस्ट केलेले आहेत.)
ग. दी. माडगुळकर आणि पु ल यांच्या प्रतिभेचा एक अप्रतिम अफलातून किस्सा.
१९७५ साली कराडला साहित्य संमेलन झाल त्याचे मावळते अध्यक्ष होते पु ल.
त्यावेळी साहिर लुधियानवी (हिंदी चित्रपट सृष्टीतले एक मोठे कवी)
मंचावर आले होते.
ते म्हणाले -
"अभी मै जो हिंदी कविता सुनाने जा रहा हु उसका कोई मराठी तर्जुमा जरा बताए।”
पुलंनी समोरच बसलेल्या माडगुळकरांना वर बोलावले आणि म्हणाले - "साहीरजींनी आत्ता काय सांगितले ते तर तुम्ही ऐकलंच आहे.
पण ह्या रूपांतरात माझी एक अट आहे;
ह्या रूपांतरात एक असा मराठी शब्द हवा ज्याला भारताच्या कोणत्याही भाषेत प्रतिशब्द नाही."
असा विश्वास होता पुलंचा मित्रावर.
मग साहिरजींनी ती कविता ऐकवली-
"एक बात कहु राजा किसीसे न कहिओ जी,
एक बात कहु राजा किसीसे न कहिओ जी,
रातभर रहियो सवेरे चले जइयो जी।
सेजियो पे दिया जलना हराम है,
खुशियों में जलनेवालो का क्या काम है?
अँधेरे में रहकर जड़ाओ, मजा पियो जी,
रातभर रहियो सवेरे चले जइयो जी।”
आणि साहिरजींचा 'जी' पूर्ण होईपर्यंत
इकडे माडगूळकरांच पूर्ण मराठी भाषांतर तयार होतं.
ते असं-
एक अर्ज सुना दिलवरा, मनीच मनी ठेवा जी,
एक अर्ज सुना दिलवरा, मनीच मनी ठेवा जी,
ओ रातभर तुम्ही राव्हा झुंझुरता तुम्ही जावा जी.
सेजेशी समई मी लावू कशाला?
जुळत्या जिवालागी जळती कशाला.
अंधा-या राती इश्काची मजा घ्यावी जी,
रातभर तुम्ही राव्हा झुंझुरता तुम्ही जावा जी.
ह्यातील 'झुंझुरता' या शब्दाला इतर कोणत्याही भाषेत प्रतिशब्द नाही.
आणि हा किस्सा इथेच संपत नाही
याच्याही वरची कड़ी म्हणजे
पुलनी त्याचवेळी तिथे पेटी मागवली आणि
तिथल्यातिथे कवितेला चाल लावली आणि
तिथल्यातिथे ती गाउन दाखवली..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा