स्वर्णिम विजय ज्योत
१६ डिसेंबर १९७१....
एक देशाभिमानाचा क्षण...
पाक विरुद्ध युद्ध जिंकल्याचा विजय दिवस...
पाकच्या जवळपास ९३००० जवानांनी आपली शस्त्रे खाली ठेवल्याचा दिवस...
देशासाठी गौरवाचा क्षण...
वीर जवानांचे स्मरण करण्याचा दिवस...
या दिवसाचे, या क्षणाचे २०२१ हे सुवर्ण महोत्सवी वर्ष...
मा. पंतप्रधानांनी १६ डिसेंबर २०२० रोजी दिल्लीत राष्ट्रीय स्मारक/ ऑल इंडिया वॉर मेमोरिअल येथे वीर जवानांना श्रद्धांजली वाहून 'स्वर्णिम विजय ज्योत' प्रज्वलित केली आणि तिथून सुरू झाली 'स्वर्णिम विजय ज्योत यात्रा'...
ही ज्योत भारतभर असलेल्या सैन्य छावणींमधून प्रवास करेल...
त्या युद्धात शौर्य गाजवलेल्या 'परमवीर चक्र आणि महावीर चक्र' प्रदान केलेल्या वीर जवानांच्या गावातून फिरवली जाईल..
जवानांमध्ये देशाभिमान जागवत, वीर जवानांना स्मरण करत परिक्रमा करेल...
आजची दिवसाची सुरुवात या ज्योतीसमोर नतमस्तक होऊन झाली…
डोळ्यासमोरून ज्योत जात असताना वेगळीच उर्मि जाणवली…
वीर जवानांसाठी डोळे भरून आले...
सलाम त्या सर्व शहीद योद्ध्यांना !!
-राजेश्वरी
२४/१०/२०२१


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा