#राजेश्वरी_किशोर
#ललित
#साप्ताहिक_संकल्पना
#शब्दसंवाद
तू आता दिवाळीला नवीन मोबाईल घे.
छे, मला काय गरज आहे नवीन मोबाईलची. चांगला चालतोय की माझा हा मोबाईल.
काहीही हं. कुठे नीट चालतोय? बघावं तेव्हा बंद असतो.
आता त्याची बॅटरी लवकर संपते त्याला मी काय करणार? मी तर तयार आहे नवीन बॅटरी
घ्यायला तुम्हीच नाही म्हणताय.
काही उपयोग नाही बॅटरीत पैसे घालून. या कंपनीच्या सगळ्याच मोबाईलची बॅटरी एक
वर्षांनंतर लवकर संपते.
पण तरीही मी नवीन मोबाईल घेणार नाही माझा हाच मोबाईल
बरा आहे.
अग, तुझा मोबाईल दे ना जरा या पेपरचा फोटो काढायचा आहे. त्यांना नियमावली
पाठवायची आहे.
अरे माझा का? तुझ्या मोबाईलवर काढ ना फोटो.
माझ्या मोबाईलवरच काढत होतो पण मेमरी फुल्ल येतेय. फोटो येत नाही.
मग पहिलं काही डिलिट कर.
सगळे प्रकार झाले करून. पण याची स्पेस फुल्ल आहे.
काल सिस्टिम अप डेट करायला पण मेमरी फुल्ल असंच आलं.
बघ मी सांगत होते नवीन मोबाईल घे म्हणून.
तुला तुझा फोन द्यायचा नसेल तर नको देऊ पण मला माझा
मोबाईल बदलायला सांगू नकोस.
अग, आजच्या आज आधार आणि पॅन कार्डची फोटो कॉपी पाठवायची आहे. तुझ्या
मोबाईलच्या कॅम स्कॅनरने काढून पाठवतो.
का तुझ्यातला स्कॅनर काय झाला?
केला डिलिट..
का?
परत तेच मेमरी फुल्ल..
कठीण आहे रे.
हम्म..
म्हणून सांगते...
फोन दे ना..
का?
एक फोन करायचाय.
तुझा?
डिस्चार्ज झालाय. आता चार्जिंग होईपर्यंत मला वेळ नाही.
असं किती दिवस चालणार?
मला माहीत नाही.
जरा मला हा मराठी मेसेज टाइप करून दे ना. त्यांना अभिप्राय पाठवायचाय.
तुझ्या मोबाईलमध्ये गूगल इंडिक होतं ना?
केलं डिलिट.
मेमरी फुल्ल.
जरा माझा एक ई मेल आलाय का बघ ना.
तुझ्या मोबाईलमध्ये मेल नाही?
आणि जरा मला मॅप पण सांग. हा रस्ता ओळखीचा नाही.
का?
मी मोबाईल नेट बंद केलंय.
का? मेमरी फुल्ल?
नाही. नेट सुरू ठेवलं की चार्जिंग लवकर संपतंय.
अरे, तुझ्या मोबाईलच्या गूगल पे वरुन या नंबरवर २००० रुपये पाठव ना.
अहो पण त्यांना कसं कळेल कुणी पाठवले म्हणून?
मी सांगतो नंतर त्यांना फोन करून.
बाबा, किती दिवस हा ३जी मोबाईल वापरणार आहात? आता नवीन घ्या ना.
माझ्या मोबाईलला काही झालं नाहीये. बघ अजून नव्यासारखाच दिसतोय की नाही? एक
ओरखडा तरी उठलाय का? नाहीतर तुमचे मोबाईल, स्क्रीनवर किती ओरखडे उठलेत बघ.
माझ्या मोबाईलला दोन वर्षं झाली मग उठणारच ना.
दोनच फक्त. माझ्याला तर आठ वर्षं झाली.
तेच तर म्हणतोय आम्ही. आठ वर्षात तंत्रज्ञान किती पुढे गेलंय. बदला आता
मोबाईल.
चालतोय ना अजून. मग कशाला उगाच खर्च करायचा..
अरे तुझ्या त्या मित्राचा फोन आला होता. त्याचे वडील गेले काल. आणि दुसर्याच्या
मुलीचं लग्न ठरलं म्हणून त्याचा पण फोन आला होता. खरं तर तुलाच सांगायची होती
बातमी त्याला.
मग मला का नाही त्याने फोन केला?
काल तुझा फोन बंद होता आणि आता सगळ्यांना माहिती झालंय, तुझा फोन गरजेच्यावेळी
काम करत नाही असं..
कधी बदलणार आहेस देव जाणे.
देव जाणे कशाला म्हणतेस? बाबा जाणे म्हण.
या महिन्यात नाही जमणार खूप खर्च झालाय.
अरे पण गेले आठ महीने आपण कुठे बाहेर गेलो नाही, गाडीत पेट्रोल देखील भरले
नाही. विचार कर, पेट्रोलचे किती पैसे वाचले ते. सिनेमा नाही, हॉटेलींग नाही. कपडे
खरेदी नाही.
तू कितीही यादी दिलीस तरी या महिन्यात मी नवीन मोबाईल
घेणार नाही.. माझ्या अडचणीला तुमचा मोबाईल द्यायचा नसेल तर तसं सांगा. मी हात नाही
लावणार त्यांना.
कठीण आहे... याच्यापुढे डोकं फोडून
काही उपयोग नाही...
०२/११/२०२०
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा