#राजेश्वरी_किशोर
#ती_एक_कल्पना
#ललित
#साप्ताहिक_संकल्पना
#ओलं_परिमाण
#थरथर_आकाश
त्यादिवशी म्हणजेच, १ फेब्रुवारी २००३ रोजी, एक अघटित घटना घडली..
सकाळी ८ वाजून ४० मिनिटांपर्यंत सगळं काही ठीक वाटत होतं..
२२ मिनिटात एक आश्चर्य लोकांना दिसणार होतं..
१६ दिवस अंतराळात संशोधन करून कोलंबिया यान अवकाशातून पृथ्वीच्या कक्षेत शिरून जमिनीवर सुखरूप उतरणार होतं.. अंतराळात फिरून एक कामगिरी पूर्ण करून जमिनीवर येणार होते..
जगभरातले लोक हा सोहळा पहाण्यास उत्सुक होते.. ते यान धरतीच्या ज्या भागात उतरणार होते त्या भागातले लाखो लोक आकाशाकडे नजर लावून बसले होते.. कोणी कोणाचे नातलग नव्हते, परिचित नव्हते, देशाभिमान म्हणावं तर एका देशातील सगळेजण नव्हते.. लाखो लोकांना खूप उत्सुकता होती, ‘त्यांनी काय केलं, काय पाहिलं’ याची... सर्वांचं स्वागत आणि अभिनंदन करण्यासाठी आतुर झाले होते सगळे जण..
एक दिवस आधीच आपले तत्कालीन प्रधानमंत्री देखील त्यांच्याशी बोलले होते. त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. कल्पना चावला भारतीय असल्याबद्दल कौतुकाचे चार शब्द ऐकवले होते..
म्हणतात ना एखाद्या गोष्टीची आतुरतेने आपण वाट पहात असतो आणि ती गोष्ट तशी घडत नाही, तसंच काहीसं झालं..
सर्वांच्या साक्षीने जमिनीकडे झेपावत असलेलं ते यान, छोटासा ठिपका..
मोठा होत जाताना पहात असतानाच अचानक अनपेक्षितपणे आकाशात प्रचंड मोठा स्फोट झाला..
थरथरलं आकाश
कडाडलं ब्रम्हांड..
लोळ तो आगीचा
धुर विरल्या जीवनाचा..
कोलंबियाचे अवशेष छिन्नविछिन्न
आला काळ काळाकभिन्न..
सहा वीरांचे विदीर्ण कलेवरं
विखरली इतस्ततः धरतीवर..
अश्रूंचा कल्लोळ ओला
परिमाणही नाही त्याला ..
आक्रोशाचा उठला प्रतिशब्द
क्षणात झालं सारं स्तब्ध…
स्मरूनी त्या दिनाला
अभिवादन वीर स्मृतीला...
अजूनही तो दिवस आठवला की अंगावर काटा येतो..
(‘थरथरलं आकाश’ ही संकल्पना मला अनेक अशा अघटित घटनांची मालिका डोळ्यासमोर मांडून गेली. त्यापैकी ही एक घटना..)
राजेश्वरी
२४/१०/२०२०
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा