हा अनुभव सकाळ पेपरच्या मुक्तपीठ सदरात ०६ डिसेंबर २०१७ रोजी प्रकाशित झाला होता..
Ohh No.... Not again....
पहाटेचे 4 वाजलेत. नुकतीच आरोहिला झोप लागलीय. खरे तर मलाही झोपेची नितांत गरज आहे पण काही केल्या झोपच येत नाही..विचार काही स्वस्थ बसू देत नाहीत... 15 वर्षांपूर्वी ज्या कटू अनुभवांना गाठीशी घेऊन पुणे सोडले होते त्याची पुनरावृत्तीच होत आहे असे वाटू लागलेय...
संध्याकाळी 6 वाजता घरी आल्यावर खरं तर किती खुशीत होती आरोही..तिला तिचा लाडका मोर पाहायला मिळाला नाही पण बाकी कितीतरी रंगीबेरंगी पक्षी तर पाहायला मिळाले.. नावे उच्चारता आली नाही तरी मोठा पोपट, लाल पोपट, निळा पोपट बघितला असे सांगायची. तिला आनंदी बघून आम्हाला पण छान वाटत होते पण थोड्याच वेळात तिचे डोके दुखायला आणि परिणामी उलट्या सुरू झाल्या.. आत्ता कुठे थकून झोपली बिचारी...
मग काय सुरू झाली विचारचक्रे.. "Exotic Birds exhibition" ची बातमी कळली आणि आम्हा दोघांनाही तमाम प्राणी पक्षी प्रेम असल्यामुळे प्रदर्शन पहायचे ठरवले. दापोडी ते सारसबाग कारने गेल्यावर प्रदर्शनाला प्रचंड गर्दी असल्याचे जाणवले. मिळेल तिथे कार पार्क केली. आरोहिला नीटसे चालता येत नसल्याने तिथून गणेश कला क्रीडा संकुल पर्यंत रिक्षा केली. खरी परीक्षा आत जाताना कळून आली... वाटले 15 वर्षांपूर्वीची परिस्थिती बदलली असेल. तिकिटे काढली, सोबत भावाची दोन मुले पण नेली होती.. एकंदर परिस्थिती बघता किमान 2 तास तरी हॉल मध्ये जाण्यास लागतील असे वाटले. बाकी ठिकाणच्या अनुभवावरून मुलगी special child आहे तिचे तिकीट लागेल का असे विचारले, तर हो घ्यावेच लागेल म्हणाले. ठीक आहे, घेतले. (यात एक अनुभव नमूद करावासा वाटला.. आंधरप्रदेश मध्ये विशाखापट्टणम ला प्रत्येक ठिकाणी तिला तिकीट लागणार नाही सांगायचे. उलट मेला सुरू असेल तर छोट्या मोठ्या तिला चक्रामध्ये बसवण्यासाठी आग्रह करायचे, ती एकटी बसू शकत नसेल तर तुम्ही बसा पण तिला तो अनुभव द्या असा त्यांचा आग्रह असतो. सुरुवातीला 1,2 वेळा काढले तर तिचे तिकिटाचे पैसे परत दिले. तीच गोष्ट ओरिसा मध्ये घडली. इथे प्रश्न पैशाचा नव्हता पण या मुलांना आपल्यात सामावून घेण्याचा होता).

तिकीट तर काढले प्रश्न तिला कुठेतरी बसवण्याचा…request करून तिला एक खुर्ची मागितली. पण तिच्याजवळ तुम्हाला थांबता येणार नाही सांगितले. कसे तरी करून भावाच्या मुलांना थांबायला परवानगी देण्यात आली.. आम्ही रांगेत, मधेच येऊन बघायचे ती कंटाळली तर नाही ना. पण लगेच volunteers तिथून हकलायचे. आरोहिला diabetes असल्याने 4 वेळा इन्सुलिन द्यावे लागते. 3 तास रांगेत उभे राहिले तरी अजून किती काळ लागेल कळत नव्हते. तिथल्यातीथे भाची ला फोन करून तिला डब्यातला खाऊ भरवायची सूचना दिली. (हो, ती आपल्या हाताने खाऊ शकत नाही). डबा संपला की सांग मी इन्सुलिन द्यायला येते म्हणाले. समोर 2,3 volunteers बघत होते पण आत मात्र सोडायला तयार नव्हते. शेवटी कसेतरी तुम्हाला एकटीला तिला घेऊन जाऊ देतो असे अगदी उपकार केल्यासारखे म्हणाले. त्याचवेळी एक शाळेतली मुलगी (साधारण 12,13 वर्षांची असेल), आई, वडील आणि भाऊ बरोबर. शाळेचे I-Card दाखवले तर त्यांना सगळ्यांना मागच्या दाराने आत जाण्यास परवानगी लग्गेच दिली. तेंव्हाही मी थोडी हुज्जत घातली पण परिणाम शून्य. त्यांचा कोणी साहेब army ex-serviceman होते त्यांना फोन करा म्हणाला पण फायदा काही नाही. अखेर साडेतीन तास वाट पाहिल्यावर आमचा नंबर लागला. आतली arrangement पाहता तिला फिरवणे कठीण झाले आणि इतकावेळ थांबून ती कंटाळून गेली होती. बाकीच्यांचे पाहून होईपर्यंत एक कोपऱ्यात एक खुर्चीवर तिला बसवून मी उभी राहिले. बाकीच्यांचे बघून झाल्यावर बाहेर पडलो.
पाहते पहाटे तिला झोप लागल्यावर डोक्यात विचार सुरू झाले... 15 वर्षांपूर्वी सोडलेले पुणे आणि आताचे काय फरक झालाय? रस्ते, fly over, गर्दी सगळे बदललंय पण मानसिकता.... ती मात्र जशी पूर्वी होती तशीच दिसतेय. ती कधी बदलणार का नाही. मी नेहमी व्हाट्सअप्प वर माझे स्टेटस.. 'Break Barriers, Open Doors : for an inclusive society and development for all persons of specially able' असे लावते. कधीतरी या मुलांना आपल्या विश्वात सामील करून घ्या. त्यांचे सगळे control कमी असतात कधी ती hyper होतात त्यांची प्रतिकारशक्ती कमी असते. ती गर्दी मध्ये गोंधळून जातात पण म्हणून त्यांना त्यांच्या आकलनशक्ती च्या समारंभात सामिलच करून घ्यायचे नाही का? कंटाळली नसती तर आरोहीने अजून काही पक्षांचा आनंद घेतला असता. तिला ओळखता येतात आवडतात म्हणूनच तर इतका त्रास होऊन सुदधा आमचा प्रयत्न असतो की तिला सगले काही मिळावे जे तिला कळते. काय चुकते माझे यात. माझ्यासारख्या अनेक माता आहेत की इच्छा असून सुद्धा निव्वळ समाज हसेल, टर उडवेल म्हणून मुलांना बाहेर काढत नाहीत.

पण आपल्या मुलांना असे आनंद मिळावेेेत ही उर्मी स्वस्थ बसू देत नाही म्हणून हा लेेेखन प्रपंच.
-राजेश्वरी किशोर
१७/११/२०१७
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा