शनिवार, २ ऑक्टोबर, २०२१

आतलं प्रेम

 #राजेश्वरी किशोर

#आतलं प्रेम 



परवा किशोर आंबे घेऊन आला. सगळे आंबे मी नीट गवतात रचत होते. एक आंबा मात्र विचित्र आकाराचा होता. तो हातात घेऊन मी बघत होते. कोणत्याच बाजूने तो आंबा वाटत नव्हता. ओबडधोबड बटाट्यासारखा.
"अरे, असला कसला आंबा आणलास. जरा नीट निवडून तरी आणायचे ना आंबे."
"तो खास तूझ्यासाठी म्हणून आणला. कापून तरी बघ."
बघूया गोड निघतोय का म्हणून मी कापला. फोडी पण नेहमीसारख्या कोयीच्या सपाट बाजूकडच्या दोन दोन आणि बाजूच्या दोन अशा होईचनात. पण चवीला अतिशय गोड, स्वादिष्ट असा तो होता.
शेवटी कोय खायचं काम माझं असतं नेहमी. दोघांनाही कोय खात बसायला आवडत नाही मग काय मी बिचारी साफ होईपर्यंत खात(---) बसते. या आंब्याची कोय खात गेले आणि गंमत म्हणजे ती निराळीच पण देखणी निघाली. पूर्ण साफ झाल्यावर बघितली तर काय, अगदी प्रेमाचे चिन्ह, बदामाच्या आकाराची कोय...
वरून ओबडधोबड दिसणाऱ्या आंब्याची कोय मात्र देखणी बदामी...
कोणाला एखाद्या गाजर, बटाटा, पपई मध्ये गणपती दिसतो तर कोणाला शिवलिंग...
मला मात्र कोयीत लपलेलं प्रेम दिसलं...
कोय हातात धरून मी विचार करत राहिले...
बऱ्याचदा आपण एखाद्याचे बाह्य रूप, रंग बघून आपले मत नोंदवतो, अपेक्षा ठेवतो पण तसं असतंच असं नाही...
कदाचित त्याचे अंतर्मन खूप प्रेमळ असेल ही. पण ते कळण्यासाठी आपल्याला त्यात डोकावता आलं पाहिजे. खरं ना? दिसतं तसं नसतं, हेच खरं.
"बघ, याला म्हणतात खरं प्रेम. ते वरून कधी दिसून येत नाही."
"हो रे बाबा. खरंय तुझं. अंतर्मनात डोकावल्याशिवाय खरं प्रेम सापडत नाही."
राजेश्वरी
०५/०६/२०२१
May be an image of food

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

पाचोळा - कुसुमाग्रज

कविता रसग्रहण    पाचोळा - कुसुमाग्रज आडवाटेला दूर एक माळ तरू त्यावरती एकला विशाळ आणि त्याच्या बिलगूनिया पदास जीर्ण पाचोळा पडे तो उदास उषा ये...